महागावात हातात कासरा धरून बैल पळवण्याच्या शर्यतीचा थरार....! कोणी जिंकली स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2022

महागावात हातात कासरा धरून बैल पळवण्याच्या शर्यतीचा थरार....! कोणी जिंकली स्पर्धा

महागाव येथे कासरा धरून बैल पळवणेच्या शर्यतीचे बक्षीस वितरण प्रसंगी विजेत्यांचा सन्मान करताना माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग चौगुले व मान्यवर.

कालकुंद्री :सी. एल. वृत्तसेवा

            महागाव (ता. गडहिंग्लज) येथे वेगसम्राट पक्ष्या बैलाचे मालक रोशन वंटमुरी यांच्या वाढदीवसानिमित्य हातात कासरा धरुन बैल पळवण्याची अनोखी स्पर्धा संप्पन्न झाली.

         या थरारक स्पर्धेत प्रथम क्रमांक- साईनाथ भोगुलकर (महागाव), व्दितीय क्रमांक विलास रेडेकर (उंबरवाडी) धावपट्टु- गुरुप्रसाद तिळवले, तृतीय क्रमांक महेश तेली (महागाव) तर चौथा क्रमांक बाबु कानगळ (महागाव) धावपट्टु सोन्या कानगळ यांनी  पटकावत रोख बक्षिसे जिंकली.

       निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील यांच्यासह रोशन वंटमुरी, विनायक सुतार, भाऊ पडवळे, नामदेव नाईक, गंगाराम पाटील, रमेश कुपटे(बापु), प्रकाश थोरवत, बाळु सुरंगे, अमित नाईक, सागर शिवणगेकर, राजु कांबळे, नितीन बेनाडी, सुशांत कुपटे, अविनाश वंटमुरी, संतोष सुरंगे, पक्ष्या ग्रुपचे कार्यकर्ते, शर्यत शौकिन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष्या ग्रुपचे अध्यक्ष श्रीधर कोणकेरी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment