मलतवाडी येथे २२ वर्षानंतर रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

05 May 2022

मलतवाडी येथे २२ वर्षानंतर रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

मलतवाडी येथे २२ वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            मलतवाडी (ता. चंदगड) येथिल श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल (ता. चंदगड) एस. एस. सी. बॅच 1999-2000 चा स्नेह मेळावा २२ वर्षानंतर अतिउत्साहात पार पडला.  कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही शाळांच्या आजी माझी शिक्षकांच्या स्वागताने आणि सन्मानाने झाली. बॅचची आठवण म्हणून दोन्ही शाळांना भेटवस्तू आणि पहिले ते दहावीच्या 168 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

               तब्बल 22 वर्षांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये शिक्षकांना तसेच मित्रमैत्रिणींना भेटण्याचा अनुभव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये मायाप्पा इंदुलकरने माजी विद्यार्थ्यांचा अल्पपरिचय करून दिला. अनिल सुंडकर, किशोरी यळगेकर, मायाप्पा पाटील, संदीप लांडे, आप्पाजी पाटील, ललिता जट्टेवाडकर, प्रकाश वरपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

         मायाताई पाटील आणि जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी प्रसाद बामणे आणि दीपक पाटील यांनी योग्य नियोजन केले. वैजनाथ पाटीलने आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी 54 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच 30 शिक्षकांनाही आपली उपस्थिती दाखवली होती. एक अविस्मरणीय सोहळा या दिवशी पहावयास मिळाला.

No comments:

Post a Comment