चंदगड पोलिसांनी सुरते येथे हात भट्टी वर छापा टाकत कारवाई केली.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड पोलीस ठाणे अंतर्गत पाटणेफाटा पोलीस चौकीचे हाद्दीतील सुरुते, ता. चंदगड येथे दि. १५ मे रोजी सायंकाळी नागों मारूती भाटे याचे शेतात गावठी हातभट्टीवर छापा कारवाई करण्यात आली.
कारवाईत मिळाले मालाचे वर्णन पुढील प्रमाणे -- कच्चे रसायन ६० लिटर प्रति लिटर रु. १०० प्रमाणे व जळके रसायन ४० लिटर १०० रू. प्रमाणे इतर साहित्य ३०० रू. एकूण- १०३०० / - रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. घोळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जमील मकानदार, पोलीस नाईक अमोल पाटील यांनी करून संशयित इसमावर कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment