विद्याधर पाटील यांना शुभेच्छा देताना ग्रामस्थ. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विद्याधर शिवाजी पाटील यांची विमान अभियंता या उच्च शिक्षणासाठी जर्मनिला निवड झाली. या निवडीबद्दल तेऊरवाडी ग्रामस्थाच्या वतीने अशोक पाटील व प्रा. गुरूनाथ पाटील यानी विद्याधरला शुभेच्छा दिल्या.
विद्याधरने मुंबई विद्यापिठातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी संपादन केली आहे. आता एरोस्पेस इंजिनिअरिंग या उच्च शिक्षणासाठी जर्मनितिल टेक्नीकल यूनिव्हर्सिटी ऑफ ड्रॅमस्टड येथे दोन वर्षासाठी निवड झाली आहे. विमान क्षेत्रातील प्रदेशात उच्च शिक्षण घेणारे तेऊरवाडीतील विद्याधर पाटील हे पहिलेच विद्यार्थी आहेत. त्याच्या या परदेश दौऱ्याला सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, प्रा. गुरुनाथ पाटील, विकास सेवा सोसायटी माजी संचालक केदारी पाटील, संचालक सुनिल पाटील, माजी सैनिक नरसू पाटील, दिपक पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, सौ. लिला पाटील, विद्याधरची आई माजी सरपंच सौ. शर्मिला, वडिल शिवाजी पाटील आदि मान्यवरानी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment