कडलगे येथे आगीत शेतकऱ्याचे घर जळून खाक, लाखो रूपयांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2022

कडलगे येथे आगीत शेतकऱ्याचे घर जळून खाक, लाखो रूपयांचे नुकसान

 


चंदगड / प्रतिनिधी : 

कडलगे खुर्द ता.चंदगड येथील जोतीबा रामु पाटील या शेतकऱ्याच्या घराला आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत घरासह संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.सुदैवाने या आगीत जीवीत हानी झाली नाही.या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

  सोमवारी दुपारी बारा वाजता रणरणत्या उनात लागलेल्या आगीचा रौद्रावतार इतका प्रचंड होता की आग ग्रामस्थ विझवण्यापुर्वीच घरात साठवलेल्या रोख रक्कमेसह  अन्नधान्य, कपडेलत्ते,भांडी,प्लास्टिक वस्तू,फर्निचर, जनावरांची वैरण, आगीच्या भक्षस्थानी पडल्यााने जोतिबा पाटील यांचा संसारच उघड्यावर पडला.रोजंदरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे जोतिबा पाटील हे भूमिहीन शेतकरी आहेत.आज लागलेल्या भीषण आगीमुळे त्याचा सगळा संसार उद्ध्वस्त झाला आहे.या दुर्दवी  घटनेची शासनाने दखल मदत करावी ,तसेच समाजातील इतर दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थानीही मदत करुन जोतीबा पाटील यांचा संसार उभे करण्यास मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment