अतिवाड येथील सन २००३ सालची इयत्ता सातवीची बॅच |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
सरकारी मराठी मुलांची शाळा अतिवाड (ता. जी. बेळगांव ) येथील सन 2003 च्या इयत्ता 7 वीमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यास माजी विद्यार्थी आणि वर्गशिक्षिका श्रीमती व्ही. ए. नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा विद्यार्थ्यांचा बालमैत्री स्नेह मेळावा अतिवाडच्या ग्राम देवता श्री सातूबाई मंदिराच्या निसर्गरम्य आवारात अतिशय उत्साहात संपन्न झाला. गुरूंचा सत्कार करून कृतज्ञतेची पोच पावती देत आशीर्वाद घेतले . तसेच बाल मित्र-मैत्रिणींना एकमेकांना भेट वस्तू देऊन सन्मानीत करीत आपापली प्रेम आपुलकीची भावना व्यक्त केली .
याप्रसंगी श्रीमती नाईक यानी विद्यार्थ्यांच्या यापुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले . दीर्घकाळानंतर भेटलेले बाल मित्र मैत्रिणीनी शाळा व शाळेनंतर कसे दिवस गेले त्या आठवणींना उजाळा देत मनोगतं व्यक्त करीत कार्यक्रमाचा आनंद लुटला .
या कायक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले . सूत्रसंचालक नितीन पाटील, कल्लाप्पा शिवाजी कणबरकर, हणमंत पाटील यांनी केले . यल्लाप्पा डोंगरे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
No comments:
Post a Comment