घरातील महिलांचा संन्मान करणे हिच खरी लक्ष्मीपूजा -तपोरत्न रघूविर गुरूजी - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2022

घरातील महिलांचा संन्मान करणे हिच खरी लक्ष्मीपूजा -तपोरत्न रघूविर गुरूजीतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            महाराष्ट्र ही अध्यात्माची भूमि आहे . येथे घराघरात लक्ष्मी पूजन केले जाते . पण यापेक्षा घरातीत सर्व महिलांचा कोणताही वाद -भांडण न करता सन्मान केल्यास तीच खरी लक्ष्मीपूजा ठरेल असे विचार जय संतोषी माता कालिका माता आश्रम कुंगिनी चे तपोरत्न रघुविर गुरूजी यानी व्यक्त केले.        म्हाळेवाडी ( ता. चंदगड ) येथे भक्तीमय  वातावरणात  कार्यसम्राट आमदार  राजेश पाटील साहेब व सौ . सुस्मिता पाटील  यांच्या शुभ हस्ते लक्ष्मी मूर्ती प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली .  यावेळी जय संतोषी माता आश्रम कुंगिनी चे स्वामी तपोरत्न रघुवीर  गुरजी यांचा शुभ हस्ते मंदिराचा कळसारोहन समारंभ संपन्न झाला . यावेळी आयोजीत कार्यक्रमात श्री रघूविर स्वामी बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सी .ए. पाटील होते . 

              तपोरत्न रघूविर स्वामी पुढे बोलताना म्हणाले , महाराष्ट्र ही महालक्ष्मीची भूमि आहे .  येथे लक्ष्मीची मंदिरे उभारून अध्यात्म जपला जातोय हि चांगली गोष्ट असली तरीही प्रत्येक घरातील भांडण बाजूला सारून महिलांचा सन्मान केल्यास तीच खरी लक्ष्मी पूजा ठरेल. ध्यात्माशिवाय पर्याय नसून जीवन सुखी बनवायचे असेल तर इश्वराची संगत करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले .

              यावेळी म्हाळेवाडी लक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कमिटी  सरपंच , उपसरपंच , सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी , तरूण मंडळ ' बचत गट ' भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित  होते.


No comments:

Post a Comment