म्हाळेवाडी येथे भक्तीमय वातावरणात आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी मूर्ती प्रतिष्ठापना - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2022

म्हाळेवाडी येथे भक्तीमय वातावरणात आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी मूर्ती प्रतिष्ठापना

                       आमदार राजेश पाटील व सौ. सुस्मिता पाटील यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना झाली. 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

म्हाळेवाडी ग्रामस्थ  दानशूर व्यक्ती व माहेरवासिनी यांच्या सहकार्यातून म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे साकारलेल्या श्री लक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार ;वास्तूशांती मुर्ती प्राणप्रतिष्ठापना आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते तर कळसारोहण तपोरत्न रघुवीर गुरूजी (जय संतोषी माता आश्रम कुंगिनी) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

          

 म्हाळेवाडी ग्रामस्थांनी स्वनिधीतून आकर्षक असे लक्ष्मी मंदिर बांधले आहे . या मंदिराचा जिर्णोद्धार  वास्तूशांती  'मुर्ती प्राणप्रतिष्ठापना  सोहळा संजय पाटील यांच्या अधिपत्याखाली जमवंत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व पुरोहित वेदशास्त्र  संपन्न सुनिल सोमन व सहकारी यांच्या मंत्रघोषात संपन्न झाला .आज आमदार राजेश पाटील व सौ . सुस्मिता पाटील यांच्या हस्ते श्री लक्ष्मी व मरगुबाई मर्तीची स्थापना व पूजा करण्यात आली .

तर कळस पूजन मुंबईकर ग्रामस्थांनी केले . यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले ' गावामध्ये एकी असेल तर कोणतेही काम सहजपणे करता येते . अशीच  गावामध्ये एकी  ठेवून गावच्या विकासाला चालना द्या . माझ्या आमदार होण्यामध्ये सिंहाचा वाटा म्हाळेवाडीकरांचा आहे . यांचे सदैव ऋण माझ्यावरती असून गावच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वाला आमदार पाटील यानी दिले .

यावेळी तपोरत्न रघूवीर महाराज यांची फुलांची उधळण करत  टाळ मृदंगांच्या तालावार गावातुन मिरवणूक काढण्यात आली . या कार्यक्रमाला संपूर्ण म्हाळेवाडी ग्रामस्था बरोबर परिसरातील सर्व गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .No comments:

Post a Comment