हलकर्णी फाटा येथे शाहु महाराजांना आदरांजली - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2022

हलकर्णी फाटा येथे शाहु महाराजांना आदरांजलीचंदगड /प्रतिनिधी

हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयाच्या वतीने हलकर्णी फाटा येथे राजर्षी शाहू महाराजांना शंभर सेकंद स्तब्ध राहून विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या इमारतीपासून हलकर्णी फाटा येथपर्यंत विद्यार्थी-विद्यार्थिनींची रॅली काढून शाहू महाराजां विषयी घोषणा देण्यात आल्या फाट्यावरील सर्व व्यापारी व्यावसायिक उद्योजक व रहिवाशांना एकत्र घेऊन 100 सेकंद स्तब्ध राहून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले.


यावेळी सर्वसामान्य नागरिकांचे प्रवाशांनी रस्त्यातच आपल्या गाड्या थांबवून या लोक राजाला अभिवादन करण्यासाठी राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.पी. ए. पाटील, प्रकल्प अधीक्षक डॉ. राजेश घोरपडे, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पोतदार, प्रा. डॉ. जे.जे. व्हटकर, प्रा. जी.जे गावडे,प्रा. एम.एस. तायडे, संतोष सुतार, पूजा सुभेदार, अविनाश पाटील, प्रमोद पाटील, पांडुरंग चव्हाण यांच्यासह हलकर्णी फाटा येथील व्यापारी व्यवसायिक महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रवासी आदी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment