शिवाजी पाटील याना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू |
तेऊरवाडी/ सी. एल. वृत्तसेवा
विविध सामाजिक कार्यातील सहभाग आणि उल्लेखनिय कार्य लक्षात घेऊन गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे गावचे सुपुत्र शिवाजी सुबराव पाटील यांना सन 2019 या वर्षाचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आल . या पुरस्काराचे वितरण राज्याचे कामगार व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. पंचवीस हजाराचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र, मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे गावचे सुपुत्र शिवाजी सुबराव पाटील हे सर्वसामान्य कुटुंबातील असून सध्या पुण्यामध्ये टाटा मोटर्स येथे गेल्या 28 वर्षापासून नोकरी करत आहेत. नोकरी करत असताना कामाची गुणवत्ता पाहून कंपनीने त्यांना सेफ्टी अवॉर्ड, सजेशन अवॉर्ड, उत्तम हजेरी पुरस्कार प्रदान केले आहेत. कंपनीद्वारे आयोजित होणाऱ्या सर्व कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. नोकरी करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने गरजूंना कपडे वाटप, अनाथ आश्रमाला साहित्य वाटप, स्वाइन फ्लू लसीकरण अभियान, नदीप्रदूषण अभियान एड्स जनजागृती, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, ऊर्जा संवर्धन रक्तदान, वधूवर मेळाव्याचे आयोजन, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आधी सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो तसेच सामाजिक संस्कृती शैक्षणिक व क्रीडा, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात होत असलेल्या घडामोडी त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने या पुरस्काराच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
याप्रसंगी कामगार विभाग प्रधान सचिव विनिता वेध सिंगल कामगार आयुक्त सुरेश जाधव विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ. अश्विनी जोशी उपसचिव डॉ. श्रीकांत फुल कुंडवार, कामगार विभागाचे उपसचिव शशांक साठे, कल्याण आयुक्त रविराज इळवे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment