गवसे येथील पावणाई सेवा संस्थेच्या दोन नुतन संचालकांविरोधात तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2022

गवसे येथील पावणाई सेवा संस्थेच्या दोन नुतन संचालकांविरोधात तक्रार



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

गवसे (ता. चंदगड)  येथील पावणाई विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत विजयी झालेल्या अल्लाबक्ष फक्रु सय्यद व जयसिंग लक्ष्मण माडेकर या संचालकांविरोधात तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून  सहाय्यक निबंधक यांच्याकडे प्रल्हाद कुंदेकर यांच्यासह संस्थेच्या सभासदांनी तक्रार केली आहे.  या दोघांचे संचालक पद रद्द व्हावे अशी मागणी केली आहे. 

      या दोन उमेदवारानी  नामनिर्देश दाखल करून शासन परिपत्रकानुसार तिसरे अपत्य असूनही निवडणूक कार्यक्रमात भाग घेतला. या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या बाबतचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सुजय येजरे यांच्याकडे सादर  सादर केले होते. छाननी कार्यक्रमात अनिल कृष्णा पाटील यांनी अल्लाबक्ष सय्यद यांना तीन अपत्य असल्याचे हरकत घेतली होती. तसेच अनिल कृष्णा पाटील यांनी मुख्याध्यापक विद्या मंदिर यांचे प्रमाणपत्र  दाखल केले होते.  अल्लाबक्ष सय्यद व नहीदा अल्लाबक्ष फक्रू सय्यद यांना तिसरे अपत्य हे सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील सन २००१ च्या दुरुस्तीनुसार तिसरे आपत्य आहे. तसेच जयसिंग लक्ष्मण माडेकर यांचाही तीन अपत्य असल्याचा ग्रामपंचायत काजिर्णे-  म्हाळुंगे येथील जन्म  दाखले देऊनही चुकीच्या पद्धतीने शासनदरबारी निवडणूक आयोगाने निवडणूक पार पाडली. सय्यद आणि जयसिंग माडेकर यांनी पावणाई देवी निवडणुकीत नामनिर्देश खोटी माहिती देऊन शासन दरबारी चुकीच्या पद्धतीने घोर फसवणूक केली आहे. त्यांचे संचालकपद रद्द व्हावे अशी मागणी सहाय्यक निबंधक यांच्याकडे प्रल्हाद कुंदेकर, अनिल पाटील, मोहन पाटील, पांडुरंग नार्वेकर आणि बाबाजी पाटील यांनी केली आहे. सय्यद व माडेकर यांनी जाणीवपूर्वक शासनदरबारी खोटी माहिती पुरवून संस्थेचा कारभार पाहण्यासाठी संचालक बनले. अशा संचालकापासून संस्थेचा चुकीचा कारभार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संस्थेमध्ये त्यांना भाग घेण्यापासून मनाई करावी किंवा असा आदेश पारित करावा व  जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी अनिल पाटील यांनी केली आहे, प्रल्हाद कुंदेकर यांनी केली आहे.




No comments:

Post a Comment