कालकुंद्री (ता. चंदगड) येथील आप्पाजी लक्ष्मण वर्पे यांच्या घराची भिंत कोसळून झालेले नुकसान. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील आप्पाजी लक्ष्मण वर्पे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. भिंतीच्या शेजारी गोठ्यात दोन म्हैशी बांधल्या होत्या. भिंत कोसळण्याचा आवाज येताच प्रसंगावधान राखून वरपे यांनी दोन्ही म्हैशींना तात्काळ सोडून बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तथापि वर्पे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे यात नुकसान झाले.
मान्सून पूर्व पहिल्याच पावसात गरीब शेतकऱ्यावर ओढवलेल्या प्रसंगामुळे हळहळ व्यक्त होत आहे. आता पूर्ण पावसाळभर जनावरे बांधण्यासह आपण राहायचे कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाकडून या गरीब शेतकऱ्याला मदत मिळावी अशी मागणी होत आहे. तलाठी, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल पाठवल्याचे समजते.
No comments:
Post a Comment