व्यवसायासाठी इच्छाशक्तीला ज्ञानाची जोड हवी - रणजीत गावडे - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2022

व्यवसायासाठी इच्छाशक्तीला ज्ञानाची जोड हवी - रणजीत गावडे

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात `व्यवसाय विकास` या विषयावर रणजित गावडे मार्गदर्शन करताना

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          "व्यावसायिकाने मोठे स्वप्न पाहिले पाहिजे. स्वप्न साकार करण्यासाठी खडतर परिश्रम, इच्छाशक्ती, वेळ, कष्ट, जिद्द यांच्या जोडीला ज्ञानाची सांगड घालणे अत्यावश्यक असते. दूरदृष्टीने नियोजन पूर्वक अविरत कष्ट केल्यास यश निश्चितच दूर नाही. असे प्रतिपादन रणजीत गावडे यांनी केले. 

       चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयातील अकाउंटन्सी विभागाने आयोजित केलेल्या `व्यवसाय विकास` या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. अकाउंटन्सी विभाग प्रमुख प्रा. एस. के. सावंत यांनी `प्राप्त ज्ञानाला व्यावसायिक दृष्टिकोनाची जोड देऊन ज्ञानाचे उपयोजन करण्याला विशेष महत्त्व असल्याचे मत प्रास्ताविकात नमूद केले.` 

         अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी, `व्यावसायिक स्थैर्य मिळवण्यासाठी अपार मेहनत व सातत्याने अद्ययावत राहण्याची गरज विशद केली.` यावेळी प्रा. व्ही. के. गावडे, कु. शिवशंकर हिरेमठ, कु. रोहित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. पूजा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment