मलतवाडी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर पाटील, व्हा. चेअरमनपदी कोण...... - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2022

मलतवाडी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर पाटील, व्हा. चेअरमनपदी कोण......

शंकर पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        मलतवाडी (ता. चंदगड) येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकर बाळू पाटील यांची तर व्हा. चेअरमनपदी मुकुंद रामा पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. आर. कोळी यांनी काम पाहिले.

       संचालक मंडळात राजाराम पाटील, विठोबा पाटील, अशोक कोकितकर, सुधाकर सरवणकर, संजय पाटील, हरिबा पाटील, राणबा तरवाळ, पुण्णेश्वर सुतार, शांता पाटील, शोभा पाटील, गंगुबाई कांबळे यांचा समावेश आहे. यावेळी सचिव रुक्माण्णा पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment