तुरमुरी येथे आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी करुन घेताना महिला. |
बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा
मजदूर नवनिर्माण संघ, आश्रय फौंडेशन व ऑपरेशन मदत यांच्या संयुक्त विद्यमाने रामलिंग हायस्कूल तुरमूरी येथे मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. ऑपरेशन मदत, आश्रय फौंडेशन व मजदूर नवनिर्माण संघाच्या माध्यमातून तुरमूरीच्या रोजगाराला जाणाऱ्या कष्टकरी महिलांसाठी व शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी या आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.
आरोग्य शिबिरात बेळगांव इंडियन मेडिकल असोसिएशनचे डाॅक्टर्स, श्री ऑर्थो हाॅस्पिटलचे डाॅक्टर्स, मेटगुड हाॅस्पिटल, केएलई कंकनवाडी हाॅस्पिटल, इंडियन डेंटल असोसिएशन, भरतेश होमिओपॅथी मेडिकल काॅलेजचे डाॅक्टर्स, लॅब असिस्टंट, तुरमूरी गावातील आशा वर्कर्स आश्रय फौंडेशनचे सदस्य, मलबार गोल्डचे कर्मचारी व मजदूर नवनिर्माण संघाच्या महिला कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन गावकऱ्यांना सेवा दिली. या मेडिकल कॅंपमध्ये रोजगाराला जाणाऱ्या महिला कामगारांनी उपस्थिती लावून स्वत:ची व आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
जनरल हेल्थ चेक-अप, ऑर्थोपेडीक, स्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, बी.पी. - शुगर, हिमोग्लोबीन, आय चेक-अप, डेंटल चेक-अप अशा विविध विभागाद्वारे तपासणी शिबिर घेतले गेले, व त्यावरील गोळ्या, औषधांचे व प्रोटीन पावडरचे मोफत वितरण विद्यार्थीनींना व महिलांना करण्यात आले. कार्यक्रमाला राईट लिमिटेडचे लक्ष्मण तापसी, जेष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर, नागरत्ना, जयवंत साळुंखे, जवाहर देसाई, राजूकर, प्रकाश चेलवेटकर, डाॅ राजश्री अनगोळकर, डाॅ. मीना पाटील, विठ्ठल देसाई, राजू तारीहाळकर, वैशाली खांडेकर, प्रसाद हुली, सुरज अणवेकर (मलबार गोल्ड) व तुरमूरी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी लक्ष्मी चेलवेटकर, कविता टंगणकर व पुजा जाधव यांनी रोजगाराच्या महिलांच्या व गावाच्या वतीने आयोजकांचे आभार मानले. राहुल पाटील यांनी सर्व महिलांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment