व्यावसायिकाने धोका पत्करण्याची तयारी ठेवावी - रोहन नांदवडेकर, माडखोलकर महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

30 May 2022

व्यावसायिकाने धोका पत्करण्याची तयारी ठेवावी - रोहन नांदवडेकर, माडखोलकर महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात आयोजित व्यवसाय मार्गदर्शन वर्गात बोलताना रोहन नांदवडेकर.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      ``कोणत्याही उद्योग व्यवसायात लगेच नफा मिळत नाही. यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची चिकाटी आणि संयमाची गरज असते. आपण करीत असलेल्या व्यवसायातील खाचाखोचा जाणून घ्याव्या लागतात. आव्हाने व अडचणींचा सामना करत सकारात्मक दृष्टीने व्यवसाय उर्जितावस्थेला आणावा लागतो. प्रसंगी व्यावसायिकाने धोका पत्करण्याची मानसिक तयारी ठेवावी.' असे प्रतिपादन अॅक्वान चे रोहन नांदवडेकर यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील अकाउंटन्सी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या व्यवसाय मार्गदर्शन वर्गात बोलत होते. 

        अध्यक्ष प्रा. एस. के. सावंत यांनी व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि समाजाची सेवा घडते असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी व्यावसायिकाने नावीन्याचा ध्यास घेऊन अथक परिश्रम करण्याची गरज विशद केली. प्रियांका बामणे हिने सूत्रसंचालन केले तर रोहन यादव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment