अडकुरचे संतोष सरदेसाई यांची गोवा राज्य प्रांत ग्राहकच्या अध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2022

अडकुरचे संतोष सरदेसाई यांची गोवा राज्य प्रांत ग्राहकच्या अध्यक्षपदी निवड

 

संतोष सरदेसाई

चंदगड / प्रतिनिधी

गोवा राज्य प्रांत ग्राहक संरक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी मुळचे अडकुर ता.चंदगड सध्या फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास असलेले उद्योजक संतोष आत्माराम सरदेसाई यांची निवड करण्यात आली आहे.फोंडा येथे संघटनेच्या राष्ट्रीय बैठकीत ही निवड करण्यात आली.यावेळी निवडीचे पत्र प्रांत ग्राहकाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यानी दिले.सरदेसाई यांचा सामाजिक कार्यातील सहभाग व ग्राहक संरक्षण हित जपण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हित निवड करण्यात आली आहे.यावेळी सुभाष भोसले, सुभाष घोडके, विजय पाटील, मनोज रावराणे उपस्थित होते. 

फोंडा गोवा येथे प्रांत ग्राहक संरक्षण च्या गोवा राज्याध्यक्षपदी निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांच्या कडून स्विकारताना संतोष सरदेसाई,

      संतोष सरदेसाई यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अडकुर येथील शिवशक्ती हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर शिक्षणासाठी व नोकरीसाठी पुण्यामध्ये गेले. त्यांचे वडील लहानपणीच गेले. त्यामुळे सर्व जबाबदारी संतोष यांच्यावर पडली. त्यानंतर त्यांनी नोकरी व्यवसायासाठी गोवा या ठिकाणी स्थायिक झाले. त्यातून छोटे-मोठे समाजकार्याला गोरगरिबांना मदत करायला सुरुवात केली. आपली पूर्वीची परिस्थिती जाणीव लक्षात घेऊन गोरगरिबांना मदत करीत असत. गोव्यामध्ये त्यांची बिझनेसमॅन व रिअल इस्टेट मालक म्हणून ओळख आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना गोवा स्टेट प्रांत ग्राहक संरक्षण अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

 No comments:

Post a Comment