इनाम सावर्डे येथील युवकाला बारा बोअरच्या बंदुकीसह अटक, कोल्हापर गुन्हे अन्वेषणची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2022

इनाम सावर्डे येथील युवकाला बारा बोअरच्या बंदुकीसह अटक, कोल्हापर गुन्हे अन्वेषणची कारवाई

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
       इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथील सागर निंगाप्पा पाटील (वय वर्षे ३७) या युवकाला बारा बोअरची बंदुक व जिंवत काडतूस बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई कोल्हापुर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज १९ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास केली.
     कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला  इ. सावर्डे येथील सागर पाटील हा बारा बोअरची बंदुक व १ जिंवत काडतुस बाळगत असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार  या पथकाने इ. सावर्डे येथील आरोपी सागर पाटील यांच्या घरोसमोरच बंदुकीसह अटक केली. बंदूक व काडतुसाची एकुण १२,२०० रुपये किमंत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पो. उपनिरीक्षक शेष मोरे, सह्यय्यक फौजदार चंदू ननवरे, सह्यय्यक फौजदार सुनिल कवळेकर, पो. हे. काॅ. अजय वाडेकर, अनिल जाधव, तुकाराम राजीगीरे, ओंकार परब यांच्या पथकाने केली.No comments:

Post a Comment