वाटंगी येथील हनुमान सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी अल्बर्ट डिसोझा,उपाध्यक्षपदी गुंडू सुतार बिनविरोध - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2022

वाटंगी येथील हनुमान सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी अल्बर्ट डिसोझा,उपाध्यक्षपदी गुंडू सुतार बिनविरोध

 

अल्बर्ट डिसोझा                 गुंडू सुतार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
     वाटंगी (ता. आजरा) येथील हनुमान  सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी  अल्बर्ट डिसोझा, उपाध्यक्षपदी गुंडू सुतार बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन राहुल गाडगीळ यांनी काम पाहिले.
         अध्यक्षपदासाठी अल्बर्ट डिसोझा यांचे नाव  संभाजी सुबराव घोरपडे यांनी सुचवले, याला अर्जुन अप्पा कबीर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी  गुंडू सुतार यांचे नाव  आदाव बस्तू डिसोझा यांनी सुचवले त्याला. यशवंत रामू तेजम यांनी अनुमोदन दिले. यावेळी नूतन संचालक अर्जून कबीर, अदाव डिसोझा, संभाजी घोरपडे, आनंद डिसोझा, मिनिंन डिसोझा,  शंकर घेवडे, यशवंत तेजम, राजाराम कांबळे, सौ.मिलाग्रीन कुरिस, अंजना कसलकर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सचिव अजित देसाई यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment