![]() |
माणगाव सेवा सोसायटीचे नुतन संचालक मंडळ व मान्यवर |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
माणगाव (ता. चंदगड) सेवा सोसायटीवर आमदार राजेश पाटील गटाची सत्ता स्थापन झाली. या सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुधिर मोतिराम लांडे यांची तर व्हा. चेअरमनपदी सुनिल बापूसो पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल सुरूतकर होते.
या क्रार्यकमाला रामचंद्र जक्काप्पा बेनके, शि. ल. होणगेकर, शिवाजी नौकूडकर, प्रकाश पाटील, गुंडू मेटकूप्पी, जयवंत सुरूतकर (तंटामुक्त अधक्ष), जानबा हरकारे, गोपाळ चव्हाण, गोपाळ रामगावडे, सिद्धोजी होणगेकर, जोतिबा गावडे, जयवंत कांबळे, दयानंद सावंत, राजू कुंभार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. नुतन संचालक शिवाजी फडके, नंदकुमार सुरुतकर, कृष्णा होणगेकर, सदानंद कुंभार, शिवाजी पिटुक, पांडूरंग कांबळे, हणमंत निटूरकर, राणबा बेनके, नामदेव चिगरे, सुमन फडके, वनिता घोळसे यांची निवड करण्यात आली.
No comments:
Post a Comment