शोषणमुक्त समाजव्यवस्थेसाठी छत्रपती शाहूंनी शैक्षणिक कांती घडवली -- प्राचार्य आनंद मेणसे - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2022

शोषणमुक्त समाजव्यवस्थेसाठी छत्रपती शाहूंनी शैक्षणिक कांती घडवली -- प्राचार्य आनंद मेणसे

 


चंदगड / प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले ज्ञानापासून वंचित समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली केली. शाळा व शिक्षकांच्या वेतनासाठी संस्थानामार्फत विशेष तरतूद केली जातीय विषमता नष्ट करण्यासाठी विविध जातीच्या विदयार्थ्यांसाठी वसतीगृहे स्थापन केली. हुशार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी उत्तेजन व सहकार्य केले. शोषणमुक्त समाजव्यवस्थेसाठी छत्रपती शाहू महाराजांनी एक मोठी शैक्षणिक कांती घडवली " असे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.
             ते येथील र भा . माडखोलकर महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या ' शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाचे खाजगीकरण या विषयावरील व्याख्यानात बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . पी . आर . पाटील होते . ते पुढे म्हणाले " शिक्षणावरील गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे . प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन नियोजन करण्याची गरज आहे . पायाभूत शिक्षण देण्याची जबाबदारी हा शिक्षणाच्या मूलभूत हक्काचाच भाग आहे शाळांचे खाजगीकरण धोकादायक असून मातृभाषेतून शिक्षण देणा - या प्राथमिक शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे . यावेळी चंदगडचे पोलिस निरीक्षक श्री संतोष घोळवे व अर्थशास्त्र परिषदेचे डॉ राहूल महोपरे यांनी मनोगते व्यक्त केली . अध्यक्ष प्राचार्य डॉ . पी . आर . पाटील यांनी बदलते शैक्षणिक पर्यावरण व आव्हानांचा गांभीर्याने विचार करून विवेकी , कृतीशील व ज्ञानाधिष्ठित समाजव्यवस्थेसाठी जागरूकतेने प्रयत्न करण्याची गरज विषद केली . मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी प्रतिमापूजन व वृक्षाला जलार्पण करण्यात आले . प्रास्ताविक समन्वयक प्रा . डॉ . ए . वाय . जाधव यांनी केले . तर प्रा.ए.डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले . प्रा . डॉ . एस.डी.गोरल यांनी आभार मानले . कार्यक्रमास प्रा . एन . एस . पाटील , प्रा.भरत सोलापूरे , प्रा . एम.जी पाटील यांच्यासह प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते .




No comments:

Post a Comment