स्त्रियांनी सकस, समतोल आहार घ्यावा :--डॉ. ऋतुजा पवार - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2022

स्त्रियांनी सकस, समतोल आहार घ्यावा :--डॉ. ऋतुजा पवार

 

माडखोलकर महाविद्यालयात बोलताना डॉ. ऋतुजा पवार

चंदगड / प्रतिनिधी 
स्त्रियांनी सकस,समतोल आहार घ्यावा.आहारातील जंक फूड चे प्रमाण कमी करावे.प्रथिने,लोह,कॅल्शियम युक्त आहारामुळे आरोग्य संपन्न जीवन जगता येईल.शारीरिक व मानसिक आरोग्याचा गांभीर्याने करायला हवा.लठ्ठपणा,तणाव,चिंता,मनो शारीरिक व्याधी टाळण्यासाठी आहार, विहार,,व्यायाम याकडे काटेकोर लक्ष देणे जरुरीचे आहे. असे प्रतिपादन डॉ. ऋतुजा पवार यांनी केले.त्या येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयातील ताराराणी सखी मंचने आयोजित केलेल्या आरोग्य विषयक व्याख्यानात बोलत होत्या.
 अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी. आर.पाटील यांनी स्त्रिया सहनशील व सोशिक असतात मात्र आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात स्त्रियांनी आरोग्याची हेळसांड करू नये असे आवाहन केले.
प्रास्ताविक समन्वयक प्रा.एस.बी. दिवेकर यांनी केले.सूत्रसंचालन कु. श्रीलेखा जोशी हिने तर आभार प्रा.सुरेखा कोळी यांनी मानले.यावेळी विद्यार्थिनींची मोफत तपासणी करण्यात आली.
      कार्यक्रमाला डॉ. ए.पी.पाटील,डॉ. आर. ए.कमलाकर, प्रा.मयुरी कांडर,प्रा.सुर्वे,प्रसाद नाईक यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment