चंदगड शहरातील पाणीपुरवठा दर सोमवारी राहणार बंद, वाचा काय आहे कारण..... - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2022

चंदगड शहरातील पाणीपुरवठा दर सोमवारी राहणार बंद, वाचा काय आहे कारण.....चंदगड / प्रतिनिधी
उष्णतेचा पारा वाढल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे चंदगड शहरातील पाणी पुरवठ्यामध्ये वारंवार अडचणीत येत आहेत . त्यामुळे दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी दिली . चंदगड शहराला तलावामधून पाणीपुरवठा केला जातो . रामलिंग तलावाची पाणी पातळी कमी झाल्याने चंदगड शहराला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अवेळी होणार असून दर सोमवारी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे . चंदगड शहराला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अवेळी होणार असून दर सोमवारी बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा , असे आवाहन नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी केले आहे.No comments:

Post a Comment