सेवा संस्थेच्या स्थापनेपासून चंदगड तालुक्यातील या सोसायटीची निवडणूक बिनविरोध, कोणत्या गावची आहे ही संस्था..... - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2022

सेवा संस्थेच्या स्थापनेपासून चंदगड तालुक्यातील या सोसायटीची निवडणूक बिनविरोध, कोणत्या गावची आहे ही संस्था.....

उदयकुमार देशपांडे

मारुती धुरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       दाटे (ता. चंदगड) येथील श्री ज्ञानेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित बेळेभाट दाटे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या स्थापनेपासून बिनविरोध निवड करण्याची परंपरा सभासदांनी राखली आहे. 

     संस्थेच्या चेअरमनपदी उदयकुमार देशपांडे व व्हा. चेअरमन पदी मारुती वैजू धुरी यांची निवड झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून शासकिय लेखापरीक्षक टी. आर. खंदारे होते.
  संचालक म्हणून जानबा यलापा किणेकर, नामदेव खरूजकर, विठ्ठल रामा मोरे, शंकर चाळोबा भोगुलकर, मनोहर बळवंत पाटील, भिमाणा नाईक, दिनेश बुरुड, सुभाष सोमाणा सातरडेकर, यशोदा गंगाजी पावले, पुजा गणपत निचम यांची निवड करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment