उत्तम धोंडीबा पाटील रघुनाथ गोपाळ भादवणकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आमरोळी (ता. चंदगड) येथील आमरोळी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम धोंडीबा पाटील (पोरेवाडी) यांची तर उपाध्यक्षपदी रघुनाथ गोपाळ भादवणकर (गणुचीवाडी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी एस. बी. येजरे होते.
अध्यक्षपदासाठी उत्तम पाटील यांचे नाव माजी चेअरमन रमेश नांगनूरकर यांनी तर उपाध्यक्षपदासाठी रघुनाथ भादवणकर यांचे नाव उत्तम पाटील यानी सुचविले. त्याला अनुक्रमे रघुनाथ भादवणकर व रघुनाथ फगरे यांनी अनुमोदन दिले. विषणुपंत यादव, आर. डी. पाटील, विजयकुमार कांबळे, अध्यक्ष उत्तम पाटील, रघुनाथ भादवणकर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक रमेश नांगनूरकर, रामु गावडे, रघुनाथ फगरे, अर्जुन रेडेकर, परशराम आर्दाळकर, विजयसिंग देसाई, सुभाना भादवणकर, सुशिला आर्दाळकर, छाया यादव, परशराम नाईक, संजय कांबळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सचिव वैजू खामकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment