तणाव मुक्तीसाठी 'एक दिवस शाळेतला' जगा! -दशरथ कांबळे, पाटणेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2022

तणाव मुक्तीसाठी 'एक दिवस शाळेतला' जगा! -दशरथ कांबळे, पाटणेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

 

सन २००० मध्ये आपल्या गुरुजनांच्या समवेत काढलेल्या छायाचित्रात विद्यार्थी. संग्रहित छायाचित्र.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
     सन १९९९-२००० तुकडीतील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा बुधवार दि. ११ मे २०२२ रोजी श्री छत्रपती शहाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पाटणे (ता. चंदगड)  येथे संपन्न झाला.  गेली चार-पाच वर्षे आपल्या सर्व वर्गमित्र- मैत्रिणींशी संपर्क साधत कवी/लेखक दशरथ कांबळे यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र केले होते. पुन्हा एकदा रेशीम गाठीत बांधून एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी करत स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने  आनंद द्विगुणीत केला.
      महापुरुषांच्या फोटो पुजनाने व आपल्या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या दशरथआण्णा कांबळे (कवी/लेखक), विद्या सुरेकर (वीर पत्नी), कविता बाचुळकर, नेहा गावडे, डॉ.युवराज पाटील, डॉ सुर्यकांत वनकुंद्रे ( कोविड योध्दा), मोहन गावडे (प्रगत शेतकरी), डॉ परशराम देवळी (शिक्षण), धोंडिबा कांबळे (हॉटेल) आदी मित्र- मैत्रिणींचा शाल, श्रीफळ, इंद्रधनू काव्यसंग्रह व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
    यावेळी मनोगतात दशरथ कांबळे म्हणाले जीवन तणाव मुक्त करायचे असेल तर शाळेतील एक दिवस पुन्हा जगला पाहिजे. याने आपले जीवन तणाव मुक्त झाल्याचा अनुभव येईल. यावेळी संतोष कांबळे, मोहन गावडे, गोमटेश कासार, विकास धाऊसकर, विद्या सुरेकर, कविता बाचुळकर, मोहन गावडे, रुपाली बागवे, डॉ युवराज पाटील, मोहन पाटील यांनीही मनोगतातून शाळेच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. २२ वर्षानंतर एकत्रित आलेले मित्र-मैत्रिणी एकमेकांची सुखदुःखे व आठवणींच्या देवाणघेवाणीत भावूक झाले होते.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment