श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर येथे लोकराजा छ .शाहू महाराजांना आदरांजली - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2022

श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर येथे लोकराजा छ .शाहू महाराजांना आदरांजली

श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे छ. शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना देताना विद्यार्थी.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये लोकराजा  छ. शाहू महाराजांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकराजा छ. शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.

      लोकराजा  छ. शाहू राजा यांच्या निधनाला ६ मे २०२२ रोजी १०० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने  लोकराजाला मानवंदना  देण्याचा कार्यक्रम  संपन्न झाला. प्रारभी कॉलेजचे प्राचार्य  व्ही. एन. सुर्यवंशी  यांचा हस्ते छ. शाहू महाराजांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. एम. पी. पाटील यांनी केले. यानंतर 100 सेकंद स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आले. 

    यानिमित्ताने अध्यापक शिवप्रसाद तेली व प्रा. रामदास बिर्जे यानी छ. शाहूंच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन पी. के. पाटील  यांनी केले. या कार्यक्रमला हायस्कूल व कॉलेजचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आभार एस. एन. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment