अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये रंगला २२ वर्षानंतर माजी विद्यार्थी मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2022

अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये रंगला २२ वर्षानंतर माजी विद्यार्थी मेळावा

श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर च्या १९९८-९९ च्या बॅचचे विद्यार्थी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

             अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज येथे १९९८-९९ बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा संपन्न झाला. या बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या रोजच्या धावपळीतून मोकळा वेळ काढत पुन्हा एक दिवस शाळेमध्ये जमून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्हॉटसअ ग्रुपच्या  माध्यमातून गेली ८ वर्षे  एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांच्या सुखं दुःखात सोबत देत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

         या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी शिक्षकांचे स्वागत व सन्मान करत  शिक्षकांप्रती असलेला आदर आणि प्रेम २३ वर्षा नंतरही कायम आहे हेच दिसून आले. या पुढे ही प्रत्येक वर्ग मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होत एक आदर्शवत वाटचाल राहील. त्याच बरोबर भागातील एखादा विद्यार्थी जर आर्थिक अडचणी मुळे शिक्षणा पासून वंचित राहत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सढळ हस्ते मदत करण्याचा  निर्धार या वेळी करण्यात आला. या वेळी शिक्षक आर. जे. पाटील  (तेऊरवाडी), श्री. फडके (माणगाव), श्री खणगुतकर  (तावरेवाडी), एस. एन. पाडले (अलबादेवी) व मुले आणि मुली असे एकूण ६० विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संदिप देसाई, युवराज शिंदे, अमर बागडी, वैभव डांगे, अमिर कोवाडकर सचिन घोरपडे, कांचन कांबळे, सरिता जाधव, महेश देसाई या माजी विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन वैभव डांगे आणि कांचन कांबळे यांनी केले. आभार श्रीकांत नेवगे यांनी  मानले.

No comments:

Post a Comment