चंदगड तालुका शिवसेना तालुका प्रमुखपदी कल्लापान्ना निवगीरे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2022

चंदगड तालुका शिवसेना तालुका प्रमुखपदी कल्लापान्ना निवगीरे यांची निवड

 


 तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुका शिवसेना तालुका प्रमुख पदी  कल्लापान्ना मारूती निवगीरे यांची  निवड करण्यात आली. गारगोटी येथे पक्षाच्या पदाधिकारी यांचा मेळावा आमदार  प्रकाश आंबिटकर यांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी हे निवड पत्र देण्यात आले. 


कल्लापान्ना निवगीरे यांनी बांधकाम कामगारांच्या माध्यमातून गेली 5 वर्ष पक्षासाठी चांगले काम केले. बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना सर्व शासकीय योजना सुरू करून  तालुक्यातील बांधकाम कामगारांची एक चांगली फळी निर्माण केली आहे. त्यातच गोरगरीब लोकाची कामे पक्षाच्या माध्यमातून करावी व लोकांना न्याय मिळवून द्यावा व पक्षासाठी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून पक्षाने त्यांना हि जबाबदारी दिले आहे. ह्या वेळी बोलताना कल्लापान्ना निवगीरे म्हणाले पक्षाने दिलेल्या ह्या जबाबदारीने मी भारावून गेलो आणि पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडून पक्ष वाढीसाठी सतत काम करून चंदगड तालुक्यात शिवसेना मजबूत करीन. या वेळी निवड पत्र देतांना संपर्क प्रमुख  आरूनभाई दुधवडकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे  आमदार प्रकाश आंबिटकर  जि. प. सदस्य. आर्जुन आंबिटकर, युवा जिल्हा संघटक डॉ. सतिश नरसिंग, उपतालुका प्रमुख कीरण क़ोकीतकर, दता पाटील व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment