चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा, घेतली तंबाखुजन्य पदार्थ न घेण्याची शपथ - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2022

चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा, घेतली तंबाखुजन्य पदार्थ न घेण्याची शपथ

चंदगड ग्रामीण रुग्णांलय येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करुन घेतली शपथ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. 

        तंबाखूमुळे  कॅन्सर सारखा दुर्धर आजार होत असल्याने तंबाखू खाणे टाळले पाहिजे असे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील हासुरे यांनी सांगितले. समुपदेशक विनायक देसाई यांनी तंबाखु व थुंकणे या मुळे होणारे आजार, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास होणारी कायदेशीर कारवाई याबद्दल माहिती देऊन उपस्थितांना तंबाखू, सिगरेट, बीडी इत्यादीसारख्या पदार्थांचे सेवन न करण्याची शपथ दिली. यावेळी क्ष- किरण तंत्रज्ञ राकेश वळवी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अश्विनी पाटील प्रयोगशाळा सहाय्यक सांगावकर, चोपडे यांच्यासह रुग्ण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment