माडखोलकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्याकडून चंदगड पंचायत समिती समोरील स्मृतीस्तंभ व परिसराची स्वच्छता करण्यात आली. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील पंचायत समितीच्या समोरील स्मृति स्तंभ व परिसराची स्वच्छता विद्यार्थ्यांनी केली. या मोहिमेत र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी या अभियानात सहभाग घेतला होता.
यावेळी आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांचे योगदान भावी पिढीला समजावे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे प्रा. टी. एम. पाटील यांनी सागितले. प्रा. ए. डी. काळे यांनी आपल्या पराक्रमी इतिहासाचा वसा आणि वारसा जोपासण्याची गरज विशद केली. प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व बलिदान यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना व्यक्त केली. सदर स्वच्छता अभियानाचे नागरिकांनी कौतुक केले असून हा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment