कोदाळीचे सुभेदार मेजर रमेश गावडे सैन्यदलातून सेवानिवृत्त - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2022

कोदाळीचे सुभेदार मेजर रमेश गावडे सैन्यदलातून सेवानिवृत्त

सुभेदार मेजर रमेश गावडे यांचा सत्कार करताना सैन्य दलातील अधिकारी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालूक्यातील कोदाळीसारख्या अत्यंत दुर्गम भागात जन्मलेल्या, भारतिय सैन्यदलात शिपाई पदापासून ते आपल्या उत्कृष्ठ कार्याच्या जोरावर सुभेदार मेजर पदापर्यंत झोपावलेले रमेश धानू गावडे सेवानिवृत्त झाले. 

       १० वी  नंतर आयटीआय पर्यंत शिक्षण पुर्ण केल्यानंतर  मेजर रमेश सैन्यदलात १९९१ साली शिपाई पदावर दाखल झाले. यानंतर नाईक, हवालदार, नाईक सुभेदार, सुभेदार ते सुभेदार मेजर पदापर्यंत मजल मारली .३१ वर्षाच्या सैन्यदलातीत सेवेत ऑपरेशन विजय , कारागिल , ऑपरेशन पराक्रमा , ऑप . रक्षक , ऑप. सदभावना जम्मू आणि काश्मिर अशा अनेक कठीण कारवायामध्ये थेट सहभाग घेतला होता . या कार्याबद्दल त्याना सैन्य दलाकडून  रक्षक मेडल , पराक्रमा मेडल अशी आठहून अधिक मेडल देवून सन्मान केला आहे .सैन्यदलात आकृष्ठ कार्य करून खडकी पुणे येथील बॉम्बे इंजिअरिंग  गृप या सैन्य दलाच्या मुख्यालयातून सुभेदार मेजर या पदावरून निवृत्त झाले . यावेळी सैन्यदलातिल विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या . ३१ वर्षे देशसेवा करून निवृत्त होणाऱ्या सुभेदार मेजर रमेश गावडे याना चंदगड लाईव्ह न्यूज टिम कडून भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा .

No comments:

Post a Comment