आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी - प्रा. डॉ. आर. डी. कांबळे, कोवाड महाविद्यालयात व्याख्यान कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

01 June 2022

आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी - प्रा. डॉ. आर. डी. कांबळे, कोवाड महाविद्यालयात व्याख्यान कार्यक्रम

प्रा. डॉ. आर. डी. कांबळे व्यसनाधिनता व आजची पीढी व मूल्यशिक्षण यावर  विचार व्यक्त करताना.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करू नव नवी आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित करण्याची ताकद केवळ आजच्या युवा तरुणांच्यात आहे . पण ही तरुणाई व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे आपले जीवन उध्वस्त करून घेताना दिसते, असे प्रतिपादन  कोवाड (ता. चंदगड) येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील् योग मूल्यशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात मराठी विभाग प्रमुख  प्रा.डॉ.आर.डी.कांबळे  यानी व्यक्त केले . अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील होते .

           डॉ.आर डी कांबळे म्हणाले, आपला देश सर्वाधिक युवा,तरुणांनी भारलेला आहे, ही युवाशक्ती विवेकी ,निरोगी,विज्ञाननिष्ठ,व्यसनमुक्त आणि सदृढ असणे ही देशाची खरी ताकद आहे .याच युवा तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता होऊ शकतो  असे स्वप्न ए. पी.जे.अब्दुल कलाम यांनी सांगितले होते . तर स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशाच्या युवापिढीला विचार मूल्य दिले, त्यामुळे ही तरुणाई  जर भरकटून  अनेक व्यसनाच्या गरतेय अडकताना दिसतेय.अलीकडे आईवडिलांपासून दूर असलेली तरुण पिढी मित्रपरिवारत व्यसनी होत आहे तर अल्पवयीन तरुण मुले, यौवन काळात तारुण्याच्या प्राप्तीने बेभान झाली आहेत.वेळीच यांना आवर घातला नाही तर कोकेन ,बिडी,शिगरेट, दारू, चरस, भांग, ड्रॅग,ब्राऊन शुगर,, पॉलिस गांजा, याचा वापर करून व्यसनी होत आहे . ही पिढी बुद्धिजीवी आहे पण अपयश,संकट,आले तर या व्यसनात अडकतेय . परिणामी नशापान करू लागतेय ..   सोशल मेडियाचा आपल्या विकासासाठी  वापर करू शकतो पण हल्लीची मुळे मुलीही  शॉपिंग, गेमिंग ,टेलिव्हिजिन याच्या आहारी जाताना  दिसू लागली आहे . रेव्ह, पार्ट्या,बार,डिस्कोतुन हे दिसू लागले आहे .   त्यासाठी पालकांनी शाळा 'कॉलेज जीवनात संस्कार धडे देणे त्याच्याकडे लक्ष देणे  तितकेच गरजेचे  आहे .नाहीतर आपल्या मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते , देशाची युवा पिढी  वाया  जाण्याची दाट शक्यता आहे, म्हणूनच बालवयातच  संस्कार देणे काळाची  गरज असल्याचे सांगीतले . अध्यक्षीय भाषणात प्राचार्य.डॉ. व्ही.आर.पाटील यांनी तरुण मुलांनी यश अपयश पचवून जीवन प्रवास करण्याचे आवाहन केले .

प्रास्तविक.डॉ.एस.एन. गावडे स्वागत आणि ओळख प्रा.डॉ.बी.एस.पाटील यांनी करून आपल्या विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.सूत्रसंचालन प्रा.शिवांनद सिद्धगोंड,आभार डॉ.एस बी.पाटील यांनी केले.यावेळी डॉ.व्ही.के.दळवी,प्रा.एसजे.पाटील.प्रा.मुकेशकांबळे,प्रा.शीतलमंडले,डॉ.दीपकपाटील,डॉ.बी.एस.पाटील, डॉ.काळे.डॉ.वाघमारे.डॉ.ए.के.कांबळे उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे आयोजन योग मूल्य शिक्षण विभागाचे प्रमुख.डॉ.बी.एस.पाटील यांनी केले होते.

No comments:

Post a Comment