चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नागनवाडी (ता. चंदगड) येथे ट्रॅक्स मधून (ट्रॅक्स नं MH-10 C 6871) गोवा बनावटी दारूची वहातूक करताना चंदगड पोलिसानी अर्जुन आप्पांना सावंत (वय वर्ष ५०,रा नागनवाडी ) याला ताब्यात घेतले.
नागनवाडी येथील सावंत गल्लीतून ट्रॅक्स मध्ये गोवा बनावटीची गोल्डन आईस ब्लु कंपनीची २०बाॅक्स व्हिस्की वहातूक करताना चंदगड पोलिसांनी रंगेहाथ पकडले.बाजार भावाप्रमाणे दारूची एक लाख ७ हजार ५२०रुपये तर गाडीची किंमत एक लाख रूपये आहे. दारू व गाडीच्या किमतीसह एकुण दोन लाख ७ हजार ५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.पो नि.संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कारंडे अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment