आरोग्य सेविका सौ माया तुपट यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2022

आरोग्य सेविका सौ माया तुपट यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कारचंदगड /  सी. एल. वृत्तसेवा
कानूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सेविका सौ. माया धोंडीबा तुपट (रा. जंगमहट्टी) यांचा  सेवानिवृत्तीबद्दल कानूर खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी तालुकावैद्यकिय अधिकारी डाॅ. आर. . खोत होते.
सौ. माया तुपट या १९८७ साली आरोग्य सेविका म्हणून सेवेत रुजू झाल्या. ३६ वर्ष निष्कलंक व कर्तव्यात कसूर न करता तत्पर सेवा बजावली. जंगमहट्टी, कलिवडे, किटवडे, आंबेवाडी, पाटणे आदी दुर्गम भागात पायीजाऊन सेवा बजावली असे गौरवोद्गार डॉ. खोत यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून चंदगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सोमजाळ उ प्रमुख वक्ते  प्रा.विजय भाई पाटील , जंगमहट्टी विकास सेवा अध्यक्ष संभाजीराव पाटील , तिलारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुषार पाटील उपस्थित होते . धोंडीबा तुपट यांनी ही मनोगत व्यक्त केले .सौ तुपट यानी आपल्या प्रदीर्घ सेवेत राज्य,जिल्हा व तालुकास्तरीय असे एकूण १२ पुरस्कार मिळवले. डॉ बी.डी.सोमजाळ,
धोडिंबा तुपट,आरोग्य सेविका पाटील , गावडे , बेले बालरोगतज्ञ डॉ . सुधाकर पाटील व इतर परिचिका यांनी सौ.तुपट यांच्यासेवेबद्दल गौरवोद्वार 
काढले .यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने डाॅ. खोत व डाॅ.सोमजाळ यांच्या हस्ते,कानूरचे सरपंच निवृत्ती पाटील , पोलीस पाटील संदिप बांदेकर, बँक आफ इंडिया कानूर , ग्रामस्थ जंगमहट्टी तिलारी शिक्षण मंडळ यांचे वतीनेही सौ.तुपट यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कुटुंबिय व मित्रमंडळी उपस्थित होते .


No comments:

Post a Comment