स्वतःची योग्यता सिद्ध करण्याचे प्रभावी मध्यम,चर्चासत्र---डॉ- पाटील र.भा.माडखोलकर महाविद्यालयात चर्चासत्र उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2022

स्वतःची योग्यता सिद्ध करण्याचे प्रभावी मध्यम,चर्चासत्र---डॉ- पाटील र.भा.माडखोलकर महाविद्यालयात चर्चासत्र उपक्रम



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

नोकरीच्या नव नवीन संधींचा शोध घेत असताना विविध परीक्षांना व निकषांना विध्यार्थ्यांना सामोरे जावे लागते , त्यामधीलच एक निकष म्हणजे चर्चा सत्र होय . चर्चा सत्रामध्ये मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कडे विशेष कौशल्य असावे लागते आणि ते कौशल्य आत्मसात करून यशस्वीही होता येते असे मत डॉ . एन . के . पाटील सर यांनी र . भा . माडखोलकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या ग्रुप डिस्कशन उपक्रमाच्या वेळी मांडले . ग्रुप डिस्कशन मध्ये सहभागी होताना औपचारिक भाषेबरोबरच , देहबोली आणि ग्रुपमधील बोलण्यातील इतर सहकारी यांच्याबरोबर शिष्टाचार पाळले की ग्रुप डिस्कशन प्रभावी होते असेही ते म्हणाले . यावेळी कला शाखेकडे विद्यार्थ्यांची विविध ग्रुपमध्ये विभागणी करून त्यांना चर्चेसाठी “ The Education Emergency after Covid Pandemic " हा विषय देण्यात आला . विध्यार्थ्यांनी कोरोना कालावधी नंतर शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली आणीबाणी सदृश्य परिस्थितीवर चर्चा केली.





No comments:

Post a Comment