स्वप्नवेल पॉइंट्सनजीक अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळला - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2022

स्वप्नवेल पॉइंट्सनजीक अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळलाचंदगड / सी. एल. वृत्तसेवा
 कळसगादे (ता. चंदगड) गावाच्या हद्दीत असणाऱ्या स्वप्नवेल पॉईंट जवळील कॅनॉल  ब्रिजच्या खाली एका अनोळखी पुरुष जातीचे प्रेत  चंदगड पोलिसांना सापडले आहे. 
       कळसगादे गावानजीक स्वप्नवेल पॉइंटकडे जाणाऱ्या कॅनॉल ब्रिजच्या खाली एका अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडले. या प्रेताचे वय अंदाजे ३५ वर्षे असण्याची शक्यता आहे. प्रेताच्या अंगात बारीक चेकचा फिकट चॉकलेटी शर्ट व काळ्या रंगाची स्पोर्ट नाईट पॅन्ट त्यावर इंग्रजीमध्ये स्पोर्ट आणि वन असे लिहिलेले आहे.  चॉकलेटी रंगाची डिकक्षी कंपनीची अंडरवेअर, उजव्या हाताच्या मनगटावर पुढील बाजूस त्रिशूळ, डमरू आणि सापाचे चित्र गोंदलेले आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे कळसगादेचे पोलीस पाटील सदानंद विठ्ठल सुतार यांनी चंदगड पोलिसांना कळवले. चंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत. No comments:

Post a Comment