चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात 'पर्यावरण जागृती व स्वच्छतेचे महत्व' या विषयावर निबंध स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2022

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात 'पर्यावरण जागृती व स्वच्छतेचे महत्व' या विषयावर निबंध स्पर्धा

माडखोलकर महाविद्यालयात 'पर्यावरण जागृती व  स्वच्छतेचे महत्व' या विषयावर बोलताना प्रा. एस. एन. पाटील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "आजादी का अमृत महोत्सव" व "माझी वसुंधरा अभियान" या उपक्रमांतर्गत 'पर्यावरण जागृती व  स्वच्छतेचे महत्व' या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.

               प्रा. एस. एन. पाटील यांनी स्वयंसेवकाना "स्वच्छ भारत - सुंदर  भारत" या विषयावर मार्गदर्शन केले. स्वच्छतेची सुरवात स्वपासूनच करा. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी युवकानीच पुढाकार घेतला पाहिजे. मानवी दुष्क्रृत्यानी वसुंधरा कुरूप बनवायला सुरुवात केली आहे, शिक्षित जानकार पीढीला याकडे दुर्लक्षुन चालणार नाही. वेळीच जागे व्हा असा सूचक संदेश तरूणाईला दिला.  डॉ. एन.  एस. मासाळ यानी आभार मानले.

No comments:

Post a Comment