माडखोलकर महाविद्यालयात 'पर्यावरण जागृती व स्वच्छतेचे महत्व' या विषयांतर्गत स्वच्छता मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2022

माडखोलकर महाविद्यालयात 'पर्यावरण जागृती व स्वच्छतेचे महत्व' या विषयांतर्गत स्वच्छता मोहीम



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कला शाखेच्या वतीने "आजादी का अमृत महोत्सव" व "माझी वसुंधरा अभियान" या उपक्रमांतर्गत 'पर्यावरण जागृती व  स्वच्छतेचे महत्व' या विषयांतर्गत  स्वच्छता मोहीम  आयोजित करण्यात आली. 

             डॉ.  एन. एस. मासाळ  यांनी " ओझोन क्षय" या विषयावर मार्गदर्शन केले. ओझोनचा -हास व तपमानाचा वाढता प्रादुर्भाव मानवी जीवनाला अत्यंत घातक आहे, मानवाला इथून पुढे पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा गांभीर्याने विचार कराया हवा. असे मत व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वसुंधरा  सुरक्षेची शपथ दिली. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या शपथ समार॔भात उत्सफूर्त सहभाग घेतला. रा. से. यो. चे प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यानी सर्वांना शपथ दिली व उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment