तेऊरवाडी विकास सेवा संस्था चेअरमन निवडीवेळी नूतन संचालक व ग्रामस्थ |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील श्री राम विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सर्व पक्षानी एकत्र येऊन बिनविरोध केली. आमदार राजेश पाटील गटाची सत्ता असलेल्या या सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी आमदार गटाचे महेश बुच्चे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर व्हा. चेअरमनपदी तुकाराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गावच्या विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून सर्वच राजकिय गटानी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करून वादविवादाला फाटा दिला. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अशोक पाटील, दत्तात्रय पाटील, वाय. बी. पाटील, ग्रा. पं. सदस्य राजेंद्र भिंगुडे, प्रा. एन. एस. पाटील, प्रा. गुरूनाथ पाटील, एन. व्ही. पाटील, बी. एम. पाटील, एम. ए. पाटील आदिनी प्रयत्न केले.
अन्य सदस्य असे- नरसू पाटील, सुनिल पाटील, महादेव पाटील, यल्लाप्पा कांबळे, शिवाजी पाटील , तुकाराम सुतार, तुकाराम पाटील, जयवंत पाटील, चंद्रकांत भिंगुडे, श्रीमती प्रभावती पाटील, सौ. अनिता पाटील. या निवडीवेळी सहा. निबंधक ए. एस. काटकर, अशोक पाटील, सचिव शिवाजी पाटील, प्रा. गुरुनाथ पाटील, दत्तात्रय पाटील, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र भिंगुडे, परसू पाटील, एस. के. पाटील, सुबराव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment