तणावाचे समायोजन करून आव्हानांचा मुकाबला करा - डॉ. एम. के. चव्हाण - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2022

तणावाचे समायोजन करून आव्हानांचा मुकाबला करा - डॉ. एम. के. चव्हाण

माडखोलकर महाविद्यालयातील व्याख्यान प्रसंगी बोलताना डॉ. एम. के. चव्हाण.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      "धावपळीच्या युगात मानसिक तणाव वाढत . बाह्य वस्तू विश्वातआपल्याला सुख समाधान देण्याची क्षमता नाही. योग्य दिनचर्या, ,ध्यानधारणा, सकारात्मक विचार यामुळे आपल्याला तणाव नियंत्रणात ठेवता. आपला नैसर्गिक कल व क्षमता विचारात घेऊन आपण आपल्या जीवनाचे. शिल्प घडवू शकतो. त्यासाठी तणावांचे समायोजन करून आव्हानांचा मुकाबला करणे गरजेचे आहे.' असे प्रतिपादन  डॉ. एम. के. चव्हाण यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. आर. पाटील होते.

          यावेळी मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. एल.  भादवणकर  यांनी भौतिक सुखामागे धावाधाव, मोबाईलचा विघातक वापर व जीवन शैली हे तणावाची कारणे असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी प्राचार्य पी. आर. पाटील यांनी तणावाचे कारण समजून घेऊन जीवनशैलीत बदल करण्याची गरज विशद केली. सूत्रसंचालन प्रा. एस. एन. पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment