ऑनलाइन संपादनासाठी डिजिटली सक्षम असणे गरजेचे - प्रा. आजरेकर - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2022

ऑनलाइन संपादनासाठी डिजिटली सक्षम असणे गरजेचे - प्रा. आजरेकर

माडखोलकर महाविद्यालयात आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमात बोलताना प्रा. आजरेकर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             एकविसाव्या शतकात नोकरीच्या अनेक संधी निर्माण करून देणारे एक माध्यम म्हणजे तंत्रज्ञानाचे ज्ञान होय. यातूनच आता इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी ऑनलाईन संपादन क्षेत्रात खूप वाव आहे, त्यामुळे युवकांनी डिजिटली सक्षम असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. आर. व्ही. आजरेकर यांनी केले. ते ‘आजादी का अमृतमहोत्सव – संकल्प@75’ यानिमित्त र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी डाॅ. एस. एस. सावंत होते.

            प्रा. आजरेकर पुढे म्हणाले कि, ``तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. जेव्हा आपण एखाद्या सामाजिक विषयावर मांडणी करतो त्यावेळी MS-Word ती मांडणी अधिक समृद्ध होण्यासाठी आपल्याला मदत करते. शब्द व वाक्य रचनेमध्ये आवश्यक दुरुस्त्या सुचविण्यात पासून एखाद्या शब्दाऐवजी दुसरा पर्यायी समर्पक शब्द कसा अधिक योग्य ठरू शकतो. या संदर्भातील सूचना व पर्याय डिजिटल माध्यम उपलब्ध करून देते. त्यामुळे आपण विविध संपादकीय संसाधनाचा वापर करून आपले लिखाण समृद्ध करावे, असेही प्रा. आजरेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. एस. सावंत यांनी भविष्यकाळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित येणाऱ्या तंत्रज्ञानासाठी युवकांनी सज्ज राहावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. एन. के. पाटील यांनी वृत्तपत्र संपादकीय क्षेत्रात असलेल्या विविध संधी विषयी माहिती दिली. आभार धीरज कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment