महादेवराव बी.एड.कॉलेज , तूर्केवाडी येथे पर्यावरण दिन संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2022

महादेवराव बी.एड.कॉलेज , तूर्केवाडी येथे पर्यावरण दिन संपन्न

 


 चंदगड/प्रतिनिधी :-- 
तुर्केवाडी (ता. चंदगड)  येथील महादेवराव बी. एड. कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष महादेवराव वांद्रे , बी.एड. कॉलेज प्राचार्य कांबळे ,विभाग प्रमुख प्रधान ,सपना देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण व संवर्धन या विषयावर बी.एड. प्रशिक्षणार्थीनी भितीपत्रिका सादरीकरण व नामशेष होत चालेल्या वन्यपशू पक्ष्यांचे चित्रप्रदर्शन मांडण्यात आले. तसेच कार्यक्रमनिमीत्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. बी. एड. प्रशिक्षणार्थीनी पर्यावरण संवर्धनावर आधारीत घोषवाक्य स्पर्धा घेऊन जनजागृतीचा एक संदेश सर्वांना दिला.                     
पर्यारण संरक्षण संवर्धनासाठी कृती कार्यक्रमांचे आयोजन महत्वाचे असलेचे प्रतिपादन प्राचार्य कांबळे सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी श्रीम. देशपांडे, एस पी गावडे, प्राचार्य सतीश धुळे, अमोल दुकळे , मेनका कांबळे, प्रशांत काजिर्णेकर ,गुरव सर, बी एड प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुकाराम नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दत्तात्रय वरगावकर यांनी केले तर आभार पूजा सुतार यांनी मानले.No comments:

Post a Comment