उत्साळी येथे भक्तीमय वातावरणात ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती व कळसारोहण सोहळा सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2022

उत्साळी येथे भक्तीमय वातावरणात ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तूशांती व कळसारोहण सोहळा सुरवात

उत्साळी येथे भावेश्वरी  देवी मंदिर दिंडीमध्ये उपस्थित भाविक

तेऊरवाडी / एस. के. पाटील

उत्साळी (ता. चंदगड ) येथे दि. ६ जून पासून ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा संपन्न होत आहे.

डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या अधिष्ठानाखाली संपन्न होणाऱ्या  या धार्मिक सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . बुधवार दि .८ जून रोजी कळस व श्री भावेश्वरी देवीची फुलानी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून भव्य संपूर्ण गावभर भव्य  मिरवणूक काढण्यात आली .  या मिरवणकीची सुरवात  विनायक देसाई , विश्वासराव देसाई , गोपाळ देसाई आदि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली .विनापूजन   मल्हारी देसाई व गणपत जाधव यानी केले . दिंडी मार्गदर्शन विठोबा गावडे व भजनी मंडळ सदावरवाडी यानी केले . यावेळी संपूर्ण गावा भगव्या पताका लावून व दारोदारी रांगोळीचा सडा टाकून  सजवले होते . गावातील सर्व पुरूषानी पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केली होती .तर महीला व युवतीनी एकाच रंगाच्या साड्या परिधान करून डोईवर भरलेला कलश घेऊन या मिरवणूकीमध्ये सहभागी झाल्या होत्या . प्रत्येकाच्या मुखात हरिनाम व टाळ मृदूंगाचा गजर गजर करत भावेश्वरीची मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली . या मिरवणूकीमध्ये उत्साळीतील सर्व अबाल वृद्धासह माहेरवासिनी दुरड्या घेरून सहभागी झाल्या होत्या . गेले चार दिवस उत्साळीतील वातावरण भक्तीमय झाले आहे.

No comments:

Post a Comment