शिरगाव ते इनाम सावर्डे दरम्यान गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल ९ लाखाचा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2022

शिरगाव ते इनाम सावर्डे दरम्यान गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल ९ लाखाचा मुद्देमाल जप्त



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

शिरगाव ते इनाम सावर्डे दरम्यान महिंद्रा बोलेरो (गाडी नं. एम. एच. ०९ सी.यु २५८४) या चारचाकी गाडीतून रम, विस्की, जीन, बिअर आदी विदेशी कंपन्यांची ५लाख ७४हजार रूपयांची दारू विनापरवाना वाहतूक करताना चंदगड पोलिसांच्या पेट्रोलिंग करणार्‍या पथकाने पकडली. या प्रकरणी तुकाराम सुभाना कोले (वय ४५ वर्षे रा.भवानी मंदिराजवळ, शिरगाव) याला ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध ६५ (ऐ) ९०,१०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बाजारभावाप्रमाणे या दारूची ५ लाख ७४ हजार किंमत व गाडीची किंमत साडेचार लाख रूपये असा एकूण ९ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक करत आहेत.



No comments:

Post a Comment