चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव-वेगुर्ला महामार्गावर पाटणे फाटा ता.चंदगड येथील सागर बिअर बार व हॉटेल मध्ये विना परवाना विक्री साठी साठा करून ठेवलेली ६२ हजार २०६ रुपयांची विविध कंपन्याची दारू व बिअर चंदगड पोलिसांनी जप्त केली.
याबाबत दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी प्रतिबंध अधिनियम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक करत आहेत.
No comments:
Post a Comment