चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष बातमी पत्र
आमदार राजेश पाटील |
तेऊरवाडी / एस. के. पाटील
विनम्रता आणि कर्तव्यकठोर भावनेतून मतदारसंघात *संपर्क, संवाद व सहभाग* या त्रिसूत्रीचा वापर करीत विकासाची गंगा प्रवाहित करणारे *अत्याधुनिक भगीरथ म्हणजे राजेश दादा*! सामाजिक क्षेत्रात वावरत असताना मानपान राग-लोभ आरोप प्रत्यारोप होणारच वैचारिक मतभेद तर अपरिहार्यच परंतु अनेक अडचणींना तोंड देऊन जे काय टिकून राहते ती म्हणजे संघटना आणि याच संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांचं शिक्षण हे बी कॉम एल . एल . बी . उच्च शिक्षित असून त्यांचे संपूर्ण शिक्षण हे बेळगावमध्ये झाले असून ते वकिली पेशाकडे न जाता सहकारमहर्षी आपल्या पंखाखाली रानपाखरंना घेऊन त्यांच्यात आकाशाचे भव्यत्व आणि सूर्याचे तेजस्व पेरणारे महापुरुष म्हणजे आमचे चंदगडकरांचे आराध्य दैवत आधारवड आमदार कै नरसिंगराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजकिय प्रवास सुरू केला .आपल्या वडिलांचा ज्ञानोपासनेचा व लोकसेवेचा तेजपुंज वसा- वारसा घेऊन स्वकर्तृत्वावर आपल्या नेत्रदीपक कार्याचा ठसा उमटवण्याची त्यांची राजकारणाची सुरवात 1997 साली सहकारामधून कोवाडमधील यशवंत पतसंस्थेच्या संचालकपासून झाली . त्यामध्ये त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम केले . त्याच कामाची पोचपावती म्हणून कै . नरसिंगराव पाटील साहेब... म्हणजे उजाड माळरानाची रूपांतरे संपन्न ज्ञान मंदिरात करणारे, साहेब... म्हणजे एक ध्यास पर्व पवित्र अशा शैक्षणिक क्षेत्राला लाभलेले स्फूर्तिस्थान त्यांनी चंदगड तालुक्यातील लाल काळया मातीत मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेची ज्ञानगंगा सुरू करून लाखो विद्यार्थ्यांच्या मनाला बुद्धीला आकार देण्याचे पुण्यशील कार्य निष्ठापूर्वक केले . त्याची जबाबदारी आमदार राजेश पाटील यांना संस्थेच्या सचिव पदाची दिली . त्यांच्या मार्गदर्शनाखाली सद्या 5 ज्युनिअर कॉलेज व 13 हायस्कूल सांभाळताना अफाट वेगाने वाहणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील नवनवीन आव्हाने, बदल, संस्थेचा वाढता विस्तार व व्याप एकीकडे सांभाळत सार्वजनिक जीवनात वावरण्यासाठी मोकळीक व बळ दिले . त्याचपद्धतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम अविरतपणे करत आहेत .
चंदगड खरेदी विक्री संघाची 2009 पासून चेअरमन पदाची धुरा सांभाळत असताना त्यांना पदाचा कधी गर्व आला नाही ,जमिनीवर पाय टेकलेला पण आकाशी संचार करणारा हा राजहंस आहे . त्यांनी चेअरमन पदाची जबाबदारी अगदी व्यवस्थित सांभाळत तालुका संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली कात टाकली म्हटलं तर वावगं ठरणार नाही . तालुक्यातील शेतकऱ्यांना सोईस्कर व्हावे म्हणून संघाच्या वतीने तुलसी बझारच्या सर्व शाखा ह्या ऑनलाईनच्या धर्तीवर चालू केल्या . शेतकऱ्यांचा संघावर चांगला विश्वास बसला असून चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून नवनवीन कल्पना रुजवल्या . त्यातून तालुक्याची विश्वासहर्ता आपसूकच मिळत गेली .सध्या 40 शाखा चालवत असताना कोल्हापूर जिल्ह्यात एक नंबरचा संघ म्हणून नावलौकिक मिळवण्यात मोठे यश संपादन केले सध्या घडीला संघाची 75 कोटी वार्षिक उलाढाल ती वाढवून 100 कोटी वार्षिक उलाढाल करण्याचे उद्दिष्ट रूपे शिवधनुष्य संचालक मंडळाने उचलेले दिसते .काम करण्याची वेगळी पद्धत वाढत चाललेली विश्वासहर्ता पाहून पाच वर्षांपूर्वी संघाला महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते राज्यस्तरीय दोन पुरस्कार देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या 2014 सालच्या निवडणुकीमध्ये पहिली गोकुळ निवडणूक लढविली . त्यामध्ये त्यांना यश आले त्यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व तालुक्यातील दुध संस्थाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रमाणीक प्रयत्न केला. 2015 साली दौलतच्या कारखान्याच्या कामानिमित्त कै . नरसिंगराव पाटील मुंबईला गेले असता त्यांचे मुंबई येथे अकाली निधन झाले . 46 वर्षे के डी सी सी बँकेच्या संचालक म्हणून काम केलेले कै . नरसिंगराव पाटील यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या संचालक पदासाठी सहकारमधील केलेल्या कामाची पोच पावती म्हणून जिल्ह्यातील नेत्यांनी आमदार राजेश पाटील यांना स्वीकृत संचालक म्हणून निवड केली.त्यानंतर 2019 साली विधानसभा निवडणुकीच्यावेळी चंदगड विभागातील राजकीय घडामोडीमध्ये तत्कालीन आमदार श्रीमती संध्यादेवी कुप्पेकर यांनी राजकरणातून घेतलेली माघार व त्या व्यतिरिक्त दादांच्या विधायक विकासकामांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा नेतृत्वाने त्यांना चंदगड विभागातून राष्ट्रवादी पक्षाच्या रिक्त झालेल्या उमेदवारीमध्ये संधी दिली . त्यांनी केलेल्या सहकारमधील अनुभवाच्या जोरावर व सहकार महर्षी नरसिंगराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामाचा अनुभव त्यांच्याकडे होता तसेच पुर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्वेसर्वा देशाचे नेते शरद पवार यांच्याशी पूर्वीपासून जवळचे संबंध असल्यामुळे व जिल्ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले . त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकिमध्ये माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर कै . नरसिंगराव पाटील,कै बाबासाहेब कुप्पेकर,कै सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढली गेली . त्यावेळी धनशक्ति विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक झाली . त्यामध्ये मतदारसंघातील मतदारांनी जनशक्तीचा विजय केला व राजेश नरसिंगराव पाटील यांना चंदगड विधानसभेचे आमदार म्हणून निवडून देण्यात आले . निवडणूक होऊन दोन चार महिने होताच संपूर्ण भारत देशावरती कोरोनाचे भयंकर मोठे संकट आले त्यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील आरोग्य विभागला अनेक अडचणी आल्या . त्यावेळी आमदार राजेश पाटील त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला . त्यानंतर राज्यात 2 वर्ष कोरोनाचे संकट आल्यामध्ये निधी खेचून आणण्यात अनेक अडचणी आल्या .परंतु सर्व मंत्र्यांशी असलेल्या संबंधामुळे दोन वर्षात विविध योजनेतून 300 कोटींचा निधी खेचून आणत मतदारसंघातील रखडलेल्या कामांना प्राधान्य देत आहेत . मतदारसंघातील सर्वांना न्याय देण्याचे काम आमदार पाटील करत आहेत.परवाच जिल्ह्याची शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या के डी सी सी बँकेच्या निवडणूकिमध्ये तालुक्यातील नेत्यांनी सर्वांना बरोबरीने घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून आमदार राजेश पाटील साहेब यांची चंदगड तालुक्यातुन बिनविरोध संचालक निवड करण्यात आली.आमदार राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील सामाजिक, शैक्षणिक,राजकीय कारर्किर्दीला हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment