आमदारकीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठीच - आमदार राजेश पाटील, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2022

आमदारकीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठीच - आमदार राजेश पाटील, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा समारंभ

शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

आमदार राजेश पाटील यांना वाढदिवसानिमित्य शुभेच्छा देताना भिकू गावडे व कार्यकर्ते.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

                चंदगड विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने मला मते दिली आहेत. या जनतेच्या सेवेसाठीच आमदारकीचा उपयोग करून मतदार संघाचा कायापालट करणार आहे.  यासाठी कार्यकर्ते हेच माझे बळ असून आपल्या सर्वांचे प्रेम व शुभेच्छा अशाच रहाव्यात, अशी अपेक्षा चंदगड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यानी व्यक्त केली.

आमदार राजेश पाटील मनोगत व्यक्त करताना.

            हलकर्णी (ता. चंदगड) येथे राष्ट्रवादी कॉग्रेस  पक्ष व कार्यकर्ते यांच्या वतीने आमदार राजेश पाटील यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार पाटील बोलत होते.

          सर्वप्रथम आमदार राजेश पाटील यांचे कार्यक्रम स्थळी आगमण होताच महिलांनी पंचारती केली. मलतवाडी येथील मायाप्पा लेझिम मंडळाने लेसिमची कला सादर करत आमदार पाटील यांचे स्वागत केले. यानंतर आमदार पाटील यांनी स्व. नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन केले. चंदगड तालूका राष्ट्रवादीच्या वतीने अध्यक्ष भिकू गावडे यांनी आमदार पाटील यांना ५५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ, चंदगड तालूका संघ, के. डी. सी. सी. संघटना, गोकुळ कर्मचारी, विविध शिक्षक संघटना, पतसंस्था संघटना, विविध मंडळे, ग्रामपंचायती, विकास सेवा संस्था, चंदगडचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, तहसिलदार  विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, 'गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालूक्यातीत हजारो कार्यकर्ते यांच्या वतीने आमदार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भैरू पाटील, कृष्णकांत वाईंगडे, शिवानंद हुंबूरवाडी यानी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला तानाजी गडकरी, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितेचे प्रशासक अभय देसाई, अली मुल्ला, जि. प. सदस्य  अरूण सुतार, एस. एल. पाटील, चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन गुंडू शिवनगेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment