आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्र नेसरी येथे शिवसेना व युवासेनेकडून रूग्णांना फळे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2022

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्र नेसरी येथे शिवसेना व युवासेनेकडून रूग्णांना फळे वाटप

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेसरी येथे शिवसेना व युवासेनेकडून रूग्णांना फळे वाटप करताना कार्यकर्ते

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख  आदित्य उध्दव ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय नेसरी ( ता. गडहिंग्लज ) येथे शिवसेना व युवासेना शाखा नेसरी मार्फत रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

  यावेळी नेसरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सत्यजित देसाई, भूषण इंगवले, विजय अस्वले, रुपेश पाटील व स्टाफ तसेच युवासेना उपतालुका प्रमुख श्रीहरी भोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती .नेसरी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश मुरकुटे यांनी प्रस्तावना केली तर, नेसरी गटप्रमुख विलास कोलेकर यांनी आभार मानले , माहिती अधिकार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मंजुनाथ गवळी, नेसरी उपशहर प्रमुख दिगंबर तेजम, नेसरी युवासेना शहरप्रमुख कैफ दड्डीकर, नेसरी युवासेना शहरसमनव्यक सचिन नाईक, भागेश पांडव, प्रशांत मुरकुटे, ऋतु मुनिव, रोहन रेडेकर, विवेक कांबळे, प्रदून्य कांबळे, गौरव आळवी आदी शिवसैनिक व युवसैनिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment