आगामी जि. प. व पं. स. निवडणूकासाठी मतदारसंघांची प्रारूप यादी जाहीर, हरकती नोंदवण्यासाठी ८ जुन पर्यंत मुदत - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2022

आगामी जि. प. व पं. स. निवडणूकासाठी मतदारसंघांची प्रारूप यादी जाहीर, हरकती नोंदवण्यासाठी ८ जुन पर्यंत मुदत



नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

       ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी जि. प. चे गट व पं. स. चे गण निश्चित करण्याकरीता प्रारुप मसुदा तयार करण्यात आला असून आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी तो प्रसिध्द केला. या प्रसिध्द झालेल्या प्रारूप यादीवर काही हरकती असल्यास नागरिकांनी लेखी स्वरूपात आपल्या तक्रारी ८ / ०६ / २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठव्यात असे आवाहन तहसीलदार विनोद रणवरे यानी केले आहे.

   चंदगड तालुक्यात ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणूकीसाठी २०१७ च्या झालेल्या निवडणुकीपेक्षा जि.प. चा एक गट व पं.स.चे दोन गण वाढणार आहेत. त्यानुसार मतदारसंघात गट व गणाची फेररचना करण्यात आली आहे. या नवीन फेररचनेनंतर नजीकच्या मतदारसंघात फोडाफोडी करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषदसाठी -  गवसे ७२, माणगांव ७३, कुदनूर ७४, तुर्केवाडी७५, तुडये ७६ हे गट 
पंचायत समितीसाठी - कानूर खुर्द १४३, गवसे १४४, अडकुर १४५, माणगांव १४६, कोवाड १४७, कुदनूर १४८, शिनोळी १४९, तुर्केवाडी १५०, तुडये १५१, हेरे १५२ हे गण प्रस्तावित करण्यात आले आहे. या निश्चित केलेल्या गट आणि गणावर नागरिकांच्या घेतलेल्या हरकती विचारात घेऊन फेरबदल करून मग हे गट व गण कायम करण्यात येणार आहेत. २००९ सालापासून जि. प. चा एक गट व पं. स. चे दोन गण गोठवण्यात आले होते.
          यावेळी  प्रस्तावित करण्यात आलेले जि. प. गट व गण, तसेच त्यामध्ये समाविष्ट केलेली गावे पुढीलप्रमाणे......
१) गवसे - जि. प. गट 

१) पं. स. कानुर खुर्द :- समाविष्ट गावे
       सडेगुडवळे, कानुर खुर्द, पिळणी, भोगोली, कानुर बु, पुंद्रा, बिजुर, कुरणी, धामापूर, बुझवडे, इनाम म्हाळुंगे, कार्जिणे, न्हावेली, उमगांव, जांबरे, कोकरे, अडूरे, कोळींद्रे इनाम, नागवे, हिंडगाव व फाटकवाडी 

२) पं. स. गवसे:- समाविष्ट गावे
       शिरोली, सत्तेवाडी, कानडी, पोवाचीवाडी, इनाम सावर्डे, मौजे शिरगांव, मजरे शिरगांव, नागणवाडी, कोरज, गंधर्वगड, नागनवाडी, केरवडे, वाळकोळी, सातवणे, उत्साळी, अलबादेवी, इब्राहिमपूर व गवसे.

२) माणगाव जि प.

३)अडकूर पं स:- समाविष्ट गावे
         गुडेवाडी, दाटे, बेळेभाट, वरगांव, नरेवाडी, जट्टेवाडी, तांबुळवाडी, विंझणे, बोजुर्डी, मोरेवाडी, अडकूर, मलगेवाडी, गणूचीवाडी, आमरोळी, पोरेवाडी, जोगेवाडी, केंचेवाडी व आसगोळी 

४) माणगांव पं. स. :- समाविष्ट गावे
        मुगळी, सोनारवाडी, डुक्करवाडी, बागीलगे, माणगांव, मलगड, हुंबरवाडी, माणगांववाडी, लाकूरवाडी, लकीकट्टे, शिवनगे, म्हाळेवाडी, मलतवाडी, घुलेवाडी व जक्कनहट्टी

३) कुदनूर जि. प.

५) कोवाड पं. स. :- समाविष्ट गावे
       निट्टूर, तेऊरवाडी, कोवाड, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी, राजगोळी बु, यर्तनहट्टी, राजगोळी खुर्द, चन्नेहट्टी, दिंडलकोप, तळगुळी.

६) कुदनूर पं. स. :-- समाविष्ट गावे
       कुदनूर, खनेहट्टी, कालकुंद्री, किटवाड, होसूर, हुंदळेवाडी, कागणी, कल्याणपूर, बुक्कीहाळ, कौलगे, किणी, नागरदळे.

४) तुर्केवाडी जि.प गट

७)शिनोळी बुद्रुक पं. स. गण :-- समाविष्ट गावे
        महिपाळगड, कडलगे बु, करेकुंडी, सुंडी, मांडेदुर्ग, ढोलगरवाडी, कडलगे खु, मौजे कार्वे, देवरवाडी, शिनोळी बु, शिनोळी खु. 

८) तुर्केवाडी पं. स. गण :- समाविष्ट गावे
      बसर्गे, गौळवाडी, मजरे कार्वे, तुर्केवाडी, वैताकवाडी, यशवंतनगर, सुपे, तळशिनहाळ, तावरेवाडी, धुमडेवाडी, माडवळे, ढेकोळी, ढेकोळीवाडी, सरोळी, मुरूकटेवाडी.

५) तुडये जि.प गट

९) तुडये पं. स. गण :-  समाविष्ट गावे
      हलकर्णी, कलीवडे, किटवडे, जंगमहट्टी, हाजगोळी, मळवीवाडी, तुडीये, खा. म्हाळुंगे, कोलीक, हल्लारवाडी, सदावरवाडी, आंबेवाडी, करंजगाव.
 
१०) हेरे पं. स. गण :-- समाविष्ट गावे
       कोनेवाडी, आसगांव, चुरणीचावाडा, हंबीरे, सुळये, नांदवडे, शेवाळे, कोळींद्रे खा, शिप्पूर, खा सावर्डे, खा. गुडवळे, खामदळे, मोटणवाडी, रायदेवार्डी, पाटणे, जेलुगडे, पार्ले, कळसगादे, गुळब, तिलारीनगर, नगरगांव, कोदाळी, वाघोत्रे, इसापूर, मिरवेल, पारगड, नामखोल.

No comments:

Post a Comment